Saturday, August 24, 2019

गोफ


गोफ
नात्यात नातं, मैत्रीचं नातं॥
नातं सहयोगाचं, समझोत्याचं,
मन नसतं कोतं दोघांचं,
नातं मैत्रीचं॥

एकमेकां जोखतं, एकमेका फुलवतं,
मूल्य रुजवतं, “मी’’पण हरवतं,
नातं मैत्रीचं॥

ऋण फेडत, फेडत, ऋण गुंफत गुंफत
होतं नव्हत्याचं होतं, होत नव्हत्याचं होतं
नातं मैत्रीचं, मैत्रीचं॥
नातं मैत्रीचं, मैत्रीचं॥

नातं समतेचं, सहयोगाचं
नातं समझोत्याचं, स्वातंत्र्याचं।
एकमेकां जोखतं, एकमेकां फुलवतं,
मीपण हरवतं, ‘मीपण गवसतं।
ऋण फेडत, ऋण गुंफत गुंफत,
शिल्प साकारतं, नभी झेपावतं।

ऋजू स्मरण थेंब


ऋजू स्मरण थेंब

बाळे जाती दिशांतरी
मनी लागे हुरहुर।
आठव येता हरघडी
नयनी, आसवांचा पूर ॥१॥

आईजवळ बस ना जरा
गोष्ट, किस्सा सुनव कोरा
डबे रिकामे ठेवू नको
मागण्या चालू, काम रोको!  ॥२॥

माझी मात्र घाई घाई
कामे दिसती ठायी ठायी।
घड्याळाशी लागली सदैव शर्यत
एकेकाची जुळवायची पंगत ॥३॥

माझ्यासाठी मीही थोडी
हातची राखीन म्हणते।
लेखन, भजन यासाठी
सवड थोडी काढीन म्हणते ।।४॥

बाळांना या घडवत गेले
त्यांच्या सोबत उमलत गेले।
ईप्सित आयुष्याचे कळले
हर्ष-झुल्यावर हलके झुलले ॥५॥

हुरहुर आता दूर होते
घरापलिकडे उदंड काम।
दिवस-महिने संपून जाती
अजुनही फिरता चारी धाम ॥६॥

नाते आपुले कुठले उरले?
प्रश्‍न उतरतो वारंवार।
जनऋण फिटले तुमच्यामधुनी
समाधान हे अपरंपार ॥७॥

अळूच्या या पानावर
स्मरणथेंबांची घरंगळ।
रेंगाळण्यासी प्रत्येकाची
तरी उडते तारांबळ ॥८॥





गोफ

गोफ नात्यात नातं , मैत्रीचं नातं॥ नातं सहयोगाचं , समझोत्याचं , मन नसतं कोतं दोघांचं , नातं मैत्रीचं॥ एकमेकां जोखतं , एकमेका फ...