ऋजू स्मरण थेंब
बाळे
जाती दिशांतरी
मनी
लागे हुरहुर।
आठव
येता हरघडी
नयनी, आसवांचा पूर ॥१॥
‘आई’ जवळ बस ना जरा
गोष्ट, किस्सा सुनव कोरा’।
‘डबे रिकामे ठेवू नको’
मागण्या
चालू,
काम रोको!’ ॥२॥
माझी
मात्र घाई घाई
कामे
दिसती ठायी ठायी।
घड्याळाशी
लागली सदैव शर्यत
एकेकाची जुळवायची पंगत ॥३॥
माझ्यासाठी
मीही थोडी
हातची
राखीन म्हणते।
लेखन, भजन यासाठी
सवड थोडी काढीन म्हणते ।।४॥
बाळांना
या घडवत गेले
त्यांच्या
सोबत उमलत गेले।
ईप्सित
आयुष्याचे कळले
हर्ष-झुल्यावर हलके झुलले ॥५॥
हुरहुर
आता दूर होते
घरापलिकडे
उदंड काम।
दिवस-महिने
संपून जाती
अजुनही फिरता चारी धाम ॥६॥
नाते
आपुले कुठले उरले?
प्रश्न
उतरतो वारंवार।
जनऋण
फिटले तुमच्यामधुनी
समाधान हे अपरंपार ॥७॥
अळूच्या
या पानावर
स्मरणथेंबांची
घरंगळ।
रेंगाळण्यासी
प्रत्येकाची
तरी
उडते तारांबळ ॥८॥
No comments:
Post a Comment